loader
Breaking News
Breaking News
Foto

​वीज वितरण कंपनीचा घोळ न सुटल्यास मळेवाड जंक्शनवर 'रास्ता रोको'; ठाकरे शिवसेनेचा इशारा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील सुमारे १६ गावे वीज वितरण कंपनीच्या वेंगुर्ले तालुक्यातील कार्यालयाशी जोडली गेल्याने स्थानिक वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा घोळ गेल्या १७ वर्षांपासून आमदार असूनही दीपक केसरकर यांना सोडवता आलेला नाही. ठाकरे शिवसेनेने याविरोधात वारंवार आंदोलने केली, परंतु प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत हा प्रश्न सुटला नाही, तर मळेवाड जंक्शनवर प्रश्न सुटेपर्यंत ’रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पत्रकार परिषदेला ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख राजू शेटकर, अशोक धुरी, सुनील गावडे, गुरुनाथ नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना रूपेश राऊळ म्हणाले की, सावंतवाडी तालुक्यात पावसाचे आगमन झाले असून पाणीटंचाईचा प्रश्न काहीसा सुटेल, मात्र सध्या विजेचा मोठा लपंडाव सुरू आहे. तालुक्यातील नेमळे, आरोंदा, सातार्डा अशी १५ ते १६ गावे वेंगुर्ले कार्यालयाला जोडलेली आहेत. त्यामुळे या भागातील वीज खंडित झाल्यास ग्राहकांना तक्रार व कामासाठी तब्बल ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागतो.

यापूर्वी आम्ही ’भजन आंदोलन’ करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. १७ वर्षे आमदार म्हणून निवडून येऊनही हा वीज प्रश्न सुटू शकलेला नाही, ही खेदाची बाब आहे. आता येत्या ८ दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास मळेवाड येथे बेमुदत रास्ता रोको करण्यात येईल. तसेच आमदार प्रमोद जठार यांनीही विजेच्या प्रश्नावर जुन्या आठवणींना उजाळा देण्यापेक्षा ग्राहकांना अंधारात राहावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg