loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप बूथ प्रमुख निखिल घाग यांच्या आगग्रस्त कुटुंबाला भाजपकडून मदतीचा हात

रत्नागिरी - शहरातील प्रभाग क्रमांक ११ झाडगाव येथील भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख निखिल घाग यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत घरातील संपूर्ण वायरिंग, फ्रिज, टीव्ही, पंखे, मिक्सर, बेड, अन्नधान्य तसेच इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले. सदर घटनेची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांना देण्यात आली. घटनेची गंभीर दखल घेत त्यांच्या माध्यमातून तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, नगरसेवक बाबू सुर्वे, समीर तिवरेकर व सुप्रिया रसाळ यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वतीने प्राप्त झालेली मदत सदानंद रघुनाथ घाग यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, जिल्हा सरचिटणीस ओमकार फडके, शहराध्यक्ष दादा ढेकणे, ऋषिकेश केळकर, उपाध्यक्ष आशिष मोरे, शेखर लेले, भक्ती दळी, निलेश आखाडे, प्रज्ञा टाकळे, नुपुरा मुळये तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg