loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली गोपाळगड किल्ल्याची स्वच्छता

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड या किल्ल्याला जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अचानक मंगळवारी भेट दिली. पर्यटक व जागा मालक यांच्यामध्ये पडलेला आबा उचलण्यावरून किल्ल्याच्या मालकी हक्क बाबत विषय पुढे आल्याने यावर वाद निर्माण होण्याची शक्यता होती. गेले चार दिवस किल्ल्यावर दहा पोलीस कर्मचार्‍यांची कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा ठेवण्यात आली होती. मंगळवारी स्वतः पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी किल्ल्याला भेट दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भेटीबाबत पत्रकारांजवळ बोलताना आपण किल्ल्याच्या आतील जागा मालकाची भेट घेतली. त्यांनाही या जागेच्या अधिग्रहणाबाबतचे प्रक्रिया सुरू असल्याचे माहित आहे. यामुळे कोणताही मोठा वाद त्या ठिकाणी नाही. गुहागर तालुक्यातील गोपाळगड हा पुरातत्व विभागाचा आहे. आतील जमिनीचे मालक खाजगी असली तरी सदर जागा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे सदर किल्ला पाहण्यासाठी सर्वांसाठी खुला असल्याची माहिती देत नागरिकांनी कोणत्याही अफवा, अपप्रचार किंवा दिशाभूल करणार्‍या संदेशांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली यांनी गोपाळ गडाला भेट देताना आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यांचा गडावर स्वच्छता कार्यक्रम राबवून गडाच्या स्वच्छ व संवर्धनाचा संदेश दिला आहे.त्यानंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे स्वच्छता मोहीम राबवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गड संवर्धनासाठी गडाचे जतन व संवर्धनासाठी स्वच्छता करणे गरजेचे आहे. असेही यावेळी त्यांनी संदेश दिला. तसेच गडावर आणखी काही दिवस पोलीस कर्मचारी संरक्षणासाठी ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg