loader
Breaking News
Breaking News
Foto

जानवळे गावची सुकन्या व लिटिल चॅम्प्स जानवळेची विद्यार्थिनी मंजिरी जानवळकरचा सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जानवळे गावची सुकन्या व लिटिल चॅम्प्स जानवळेची विद्यार्थिनी मंजिरी विकास जानवळकर हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जानवळे गावाच्यावतीने सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तिच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. जानवळे गावची सुकन्या मंजिरी विकास जानवळकर हिने जानवळे येथील लिटिल चॅम्प्स स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये ९४.४०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सत्कार कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, पत्रकार गणेश किर्वे, जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर,मनसे जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव, विकास जानवळकर, विवेक जानवळकर, पार्थ जानवळकर आदि मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg