loader
Breaking News
Breaking News
Foto

भोस्ते घाटात कारला धडक देऊन पळणारा ट्रक वेरळ येथे अपघातग्रस्त

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटामध्ये एका भरधाव ट्रकने समोरून प्रवास करणाऱ्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महामार्गावरून प्रवास करणाऱ्या काही जागरूक दुचाकीस्वारांनी ट्रकचा पाठलाग करत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, भरधाव वेगाने पळून जाणारा ट्रक वेरळ परिसरात पोहोचला. वेरळ रेल्वे स्टेशन फाट्यानजिक सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरिकेटिंगवर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने बॅरिकेटिंग तोडत अपघात केला. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

टाईम्स स्पेशल

मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रस्त्याच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या बॅरिकेटिंगचेही नुकसान झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg