loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील कोकण रेल्वेच्या कर्मचार्‍याला मिळालेला मोबाईल पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे यांच्यामार्फत तेजस आहिरे यांना सुपूर्द

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - खेड येथील कोकण रेल्वेचे कर्मचारी अरविंद तांबे यांना मिळालेला मोबाईल फोन दापोली तालुक्यातील फणसु गावचे भंडारदरा येथील ग्रामस्थ तेजस आहिरे यांना खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे यांच्या मार्फत सुपूर्द करण्यात आला. कोकण रेल्वेचे कर्मचारी अरविंद तांबे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजच्या युगात समाजात आजही प्रामाणिकपणा जागृत असल्याचे अरविंद तांबे यांनी दाखवून दिले आहे. तेजस आहिरे हे खेड ते रेल्वे स्टेशन असा प्रवास करत असताना त्यानंतर को.रे.चे कर्मचारी अरविंद वसंत तांबे हे देखील त्याच रस्त्यावर प्रवास करताना त्यांना रस्त्यावर पडलेला मोबाईल आढळुन आला. तो त्यांनी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे यांचेकडे आणुन दिला होता. तो खात्री पटवून फणसु गावचे रहिवाशी तेजस अहिरे यांना नुकताच सुपूर्द करण्यात आला. अरविंद तांबे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचा जनमानसातून समाधान व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg