संगमेश्वर (सत्यवान विचारे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संगम ज्येष्ठ नागरिक (संगमेश्वर) संघाच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. संघाचे उपाध्यक्ष उदय संसारे यांच्या परसबागेत विविध फळझाडे व फुलझाडांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी नारळ, काजू, लिंबू तसेच विविध फुलझाडांची लागवड करण्यात आली. संघाचे अध्यक्ष प्रमोद शेटये यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद करताना वृक्षारोपणातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. तसेच पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी संघाचे उपाध्यक्ष उदय संसारे यांनी वृक्षांची उपलब्धता करून दिली. कार्यक्रमात प्रमोद शेटये, उदय संसारे, विनायक पाथरे, प्रकाश (दादा) कोळवणकर, गणपती नाझरे, प्रदीप शिंदे (सरपंच, मौजे असुर्डे), चंद्रकांत माने, अर्पिता संसारे यांच्यासह संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला हा पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.