loader
Breaking News
Breaking News
Foto

जाखडीनृत्य"ला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यादीत समाविष्ट करावे - माजी आमदार डॉ. विनय नातू

वरवेली (गणेश किर्वे) - जाखडी नृत्य लोककलेला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यादीत समाविष्ट करून सन २०२६ च्या गणपतीपूर्वी जाखडी नृत्य सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात यावा, अशी मागणी माजी आ. डॉ. विनय नातू यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरवर्षी कोकणातील गणपतीच्या दिवसांमध्ये सर्व गावांमध्ये जाखडी नृत्य केले जाते व या जाखडी नृत्याच्या स्पर्धा कार्यक्रम गावागावांमध्ये होत असतात. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या भागातही जाखडी नृत्याचे कार्यक्रम नाट्यगृहामध्ये केले जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सांस्कृतिक विभागामार्फत जाखडी नृत्य महोत्सव केल्यामुळे कोकणातील जाखडी नृत्याच्या लोककलेला प्रसिद्धी मिळू शकेल व या कलेचा प्रचार आणि प्रसार होईल. या जाखडी नृत्य कलेमधून विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रमही होत असतात. या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागामार्फत जाखडी नृत्य लोककलेला वाव मिळणेच्या दृष्टीने जाखडी नृत्य सांस्कृतिक महोत्सव करणेबाबत संबंधितांना आदेश द्यावे अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg