संगलट( खेड) (प्रतिनिधी) - अखिल दाभोळखाडी भोई समाज कारूळ सातगाव विभाग ग्रामीण यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी भोईराज सभागृह कारूळ येथे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व महिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चालना मिळावी म्हणून पहिली ते पंधरावी पर्यंतच्या एकूण ९० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रोपवाटिका देऊन गौरवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संगणकीय व स्पर्धात्मक युगात नोकरी व्यवसायसाठी असणाऱ्या स्पर्धा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर कारूळ सातगाव महिला समितीचा १५ वा वर्धापन दिनही दिमाखात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेश राजे, पंचायत समिती सदस्या ममता शिंदे यांनी वनविभाग दापोली यांच्या मार्फत २०० रोपवाटिका उपलब्ध करून दिल्या होत्या. महिलांचे हळदी कुंकू निमित्ताने व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्या रोपवाटिका उपस्थित सर्व महिलांना वाटप करण्यात आल्या. व झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच महिलांच्या शारीरिक समस्येबाबत मंगेश दवंडे यांनी प्रात्यक्षिक डेमो दाखवत मोलाचे मार्गदर्शन केले. विवेकानंद रिसर्च कंपनी लोटे येथील मर्चेंड व त्यांचे सहकारी यांनी खेकडा संवर्धन या व्यवसायाबाबत माहिती दिली. कारूळ सातगाव अध्यक्ष नारायण मेढेकर व सचिव प्रदिप गंधेरे यांच्या संकल्पनेतून, सल्लागार केशव सैतवडेकर व दिनकर पारधी यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप समाजसेवक संदीप पवार यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अनेक देणगीदारांनी सढळ हस्ते मदत केली.
या कार्यक्रमात सातगावाच्या वतीने श्रीधर मिंडे व गावाच्या वतीने एकनाथ सैतवडेकर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व रोपवाटिका देऊन स्वागत केले. कार्यक्रमासाठी मुंबईतून समाजाचे व सातगावाचे प्रमुख सल्लागार आर. आर. जाधव, विद्यमान अध्यक्ष शांताराम जाधव, महिला समितीच्या अध्यक्ष जयश्री सैतवडेकर, समाज कार्यकरणी सदस्य दिपक जाधव, सायली कांबरे, क्रिडा समितीचे अध्यक्ष संजय पडवळ, मुंबई सातगाव अध्यक्ष दिनेश पडवळ, सचिव विश्वनाथ जाधव, प्रशासकीय समितीचे चंद्रकांत मेढेकर, सातगाव क्रिडा समितीचे माजी सचिव बाळकृष्ण जाधव, सातगाव समाज कार्यकरणी उपाध्यक्ष मुरलीधर खडपेकर, सदस्य सदानंद दिवेकर, दिपक पारधी, संघर्ष समितीचे अनंत दिवेकर आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. स्तुत्य व नियोजनबद्ध पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.