loader
Breaking News
Breaking News
Foto

उप विभाग प्रमुख विजयकुमार भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली, शोक सभेत अनेकांना अश्रू अनावर

खेड (प्रतिनिधी) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उप विभाग प्रमुख स्वर्गीय विजय कुमार भोसले यांच्या दुःखद निधनानिमित्त आयोजित शोकसभेला परिसरातील नागरिक, शिवसैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच चारकोप विधानसभेचे आमदार योगेश सागर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख संतोष राणे, विभाग समन्वयक अशोक पटेल, विधानसभा प्रमुख राजु खान, सुषमा कदम, विधानसभा संघटक राजन निकम, सत्यवान वाणी, सविता देसाई, उप विभाग प्रमुख अनंत नागम, श्याम मोरे, आशिष पाटिल, विधानसभा समन्वयक अभिषेक दळवी, प्रदिप वस्त, शाखा प्रमुख निखिल गुढेकर, विजय मालुसरे, रवी मर्ये, सुनिल राणे, राजा पवार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय विजय भोसले यांच्या सामाजिक, राजकीय व जनसेवेतील कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. ​शोकसभेत सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून स्वर्गीय विजयकुमार भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने पक्षाचा एक निष्ठावंत, कर्तव्यदक्ष व जनसामान्यांशी जोडलेला कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ​सभेच्या शेवटी, उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांचे ऋण व्यक्त करताना स्वर्गीय विजय भोसले यांचे सुपुत्र डॉक्टर गणेशराजे भोसले यांनी अत्यंत भावुक आणि निवेदनपर सुंदर वक्तव्य केले. ते म्हणाले की, "वडिलांनी जनसेवेचा आणि लोककल्याणाचा जो ध्यास आयुष्यभर घेतला होता, तो ध्यास कुठेही थांबणार नाही.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या पश्चातही त्यांच्याच नावाने हे समाजकार्य आणि लोकसेवेचे व्रत अखंड आणि निरंतरपणे सुरू राहील." त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांना दिलासा मिळाला. ​यावेळी भोसले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत उपस्थितांनी त्यांना धीर दिला व स्वर्गीय विजय भोसले यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी प्रार्थना केली. ​भावपूर्ण श्रद्धांजली! स्वर्गीय विजय भोसले यांचे कार्य व स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील. असे अनेकांनी शोक व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg