loader
Breaking News
Breaking News
Foto

ओटवणे कापईवाडी-देऊळवाडी सीमेदरम्यान झालेल्या अपघातातील गंभीर जखमी सीमा तळवडेकर यांनी घेतला अखेरचा श्वास

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ओटवणे कापईवाडी-देऊळवाडी सीमेदरम्यान मंगळवारी दुपारी महिंद्रा पिकअप आणि प्लेजर दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या सीमा सचिन तळवडेकर (वय ४२, रा. सरमळे कुंभारवाडी) यांचे बुधवारी पहाटे गोवा-बांबोळी येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या या आकस्मिक निधनाने तळवडेकर कुटुंबीयांसह संपूर्ण सरमळे गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सरमळे कुंभारवाडी येथील आदिराज सचिन तळवडेकर हा मंगळवारी दुपारी आपल्या प्लेजर दुचाकीने (क्र. एमएच ०७ एएच ७६१४) आई सीमा तळवडेकर यांना सोबत घेऊन सावंतवाडी येथून सरमळे गावी जात होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याचवेळी जयसिंगपूर-कोल्हापूर येथील विजय रावसाहेब मगदूम हा आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच ४३ बीजी २८८९) घेऊन सरमळेहून सावंतवाडीच्या दिशेने येत होता. ओटवणे कापईवाडी-देऊळवाडी सीमेवरील अत्यंत धोकादायक वळणावर दोन्ही वाहने आली असता, त्यांच्यात चालकाच्या बाजूने जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीवरील सीमा तळवडेकर यांचा पाय हाडातून कापला गेला, तर दुचाकी चालक आदिराज याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक व पादचार्‍यांच्या मदतीने गंभीर जखमी माय-लेकाला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सीमा तळवडेकर यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने व त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने गोवा-बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या भीषण अपघाताचा त्यांना प्रचंड मानसिक धक्काही बसला होता. अखेर उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मृत सीमा तळवडेकर या माजगाव उद्यमनगर येथे कार्यरत होत्या. तर त्यांचे पती सचिन तळवडेकर हे केसरी येथील ’के. एस. आर. एक्वेरियम’मध्ये सुपरवायझर म्हणून काम पाहतात. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. त्यांच्या अकाली आणि आकस्मिक निधनाबद्दल सरमळे व सावंतवाडी परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणी सावंतवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg