loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने माझा जिवनपट बदलला – डॉ. श्रीरंग कद्रेकर

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने माझे जीवन अमुलाग्र बदलल्याचा भावनिक किस्सा डॉ.कद्रेकर यांनी आज सांगत वाचनालयाला दोन लाख रुपयांची देणगी नवीन बांधकामासाठी दिली. डॉ.कद्रेकर यांचे वडील वाचनालयात वृत्तपत्र वाचण्यासाठी येत. टाइम्स ऑफ इंडियामधील जाहिरात वाचून पुढील शिक्षणासाठी डॉ.कद्रेकरांना वडिलांनी मुंबईला पाठवले. वृत्तपत्रातली ती शैक्षणिक जाहिरात आपल्या जीवनाला नवीन दिशा देऊन गेली. ती जाहिरात वाचून वडिलांनी आपल्याला मुंबईत पाठवले व मला नवीन शैक्षणिक दिशा मिळाली. त्याकाळी आर्थिक स्थिती फार बिकट होती. पेपर विकत घेऊन वाचण्याची स्थिती नव्हती. या वाचनालयामुळे ते वृत्तपत्र वडिलांच्या वाचनात आले आणि माझे जीवन अमुलाग्र बदलले, अशी भावोत्तकट आठवण डॉ.श्रीरंग कद्रेकर यांनी सांगितली आणि तुम्ही वाचनालयासाठी जे उत्तम काम करत आहात त्यात सहयोग द्यावा आणि आपल्या जुन्या आठवणी या वाचनालयाचे ऋण याबाबत कृतज्ञतापूर्वक योगदान देत आहोत, असे भावोद्गार डॉ.श्रीरंग कद्रेकर यांनी काढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भावोत्तकट क्षणी वाचनालयाचे अध्यक्ष पटवर्धन हे डॉ. कद्रेकर यांच्या समोर नतमस्तक झाले. आपला आशीर्वाद, आपला आधार हे मला व्यक्तिगत नेहमीच भरभरून लाभले. आपण वाचनालयाला देत असलेले हे योगदान आणि आपण मुक्त वाचन विभागा संदर्भाने सांगितलेला हा क्षण वाचनालय जपून ठेवेल आणि वाचालयाचा मुक्त वाचन विभाग अधिक सुसज्ज करेल व आपला हा प्रेरणादायी अनुभव सतत स्मरणात राहावा म्हणून रचना करेल, असे सांगत ॲड.पटवर्धन यांनी डॉ.कद्रेकर यांनी दिलेला धनादेश स्विकारला. आपले आशीर्वाद असेच पाठराखण करीत रहावेत व त्यातून रचनात्मक काम अग्रेसर होत रहावे. तुम्ही दिलेली ही ऊर्जा सतत प्रेरणा देत रहावी अशा भावना ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg