loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत काँग्रेस आक्रमक! गॅस, इंधन दरवाढ आणि स्थानिक प्रश्नांवरून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : देशभरात गगनाला भिडलेल्या गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले असून, या वाढत्या महागाईच्या विरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सावंतवाडी येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर हे या गंभीर परिस्थितीवर पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. या संदर्भात जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनात म्हटले आहे की, गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असल्याने गृहिणींचे घर चालवणे कठीण झाले आहे. त्यातच सध्या गॅस सिलिंडर मिळण्यासाठी तब्बल महिन्याभराची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले असून, भविष्यात ही महागाई आणखी किती होरपळणार, अशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात शेतीकामांना वेग आला आहे. आधुनिक शेतीसाठी शेतकरी पेट्रोल-डिझेलवर चालणारी लहान यंत्रे वापरतात. मात्र, सध्या इंधनाचा तुटवडा जाणवत असून शेतकऱ्यांना कॅनमधून इंधन देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पेट्रोल पंप चालकांना कॅनमधून इंधन देण्याबाबत तात्काळ प्रशासनाने सूचना द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

टाईम्स स्पेशल

​या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मतदारसंघातील गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले. सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन सुरू असून, तिलारी धरण परिसरात बेकायदेशीर गांजा शेतीची लागवड केली जात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकारांवर प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg