loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग बांदा मार्गावर खनिज वाहतूक ट्रकची आडाळी माऊली मंदिर ठिकाणी कारला धडक, दिड तास वाहतूक कोंडी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते बांदा मार्गावर कळणे खाणीतून मोठे ट्रक अवैध खनिज वाहतूक करतात यावर प्रशासनाचा अंकुश नाही. अशा प्रकारे खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने आडाळी माऊली मंदीर नजीकच्या वळणावर एका कारला जोरदार धडक दिली. यात दोन जण जखमी झाले तर या अपघातामुळे दोडामार्ग ते बांदा मार्गावर ये-जा करणारी खाजगी वाहने एस टी बसेस अडकून पडले. दिड तास होऊन देखील पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन कुणी घटनास्थळी दाखल झाले नाही. यामुळे प्रवाशी वाहन धारकांची मोठी कोंडी झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे स्थानिक ग्रामस्थ प्रवासी यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दिड तासानंतर पोलीस घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. दोडामार्ग ते बांदा मार्गावर शनिवारी दुपारी कळणे खाणीतून बेकायदेशीर खनिज वाहतूक करणारा ट्रक जी. ए. १२ टी. ०६७२ हा खनिज भरून बांदा दिशने जात होते. तर एक खाजगी डॉक्टर आपली कार एम. एच. ०७ ए. जी. ७१६० घेऊन आपल्या दवाखान्यात जायला निघाले होते. आडाळी माऊली मंदिराच्या ठिकाणी वळणावर वडाच्या ठिकाणी आपल्या बाजूने जात असलेल्या खनिज वाहतूक ट्रकने कारला जोरदार धडक दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg