मंडणगड (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग, भूगोल विभाग, वनस्पतिशास्त्र विभाग, प्राणिशास्त्र विभाग, व निसर्ग मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष रविंद्रकुमार मिश्रा, प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. शैलेश भैसारे, महादेव वाघ, पालक शैलेश पोस्टुरे, वसीम बटे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. शैलेश भैसारे यांनी प्रास्तावना करुन जागतिक वृक्षारोपणाविषयी थोडक्यात माहिती सांगितली. तर संस्थेचे कोषाध्यक्ष रविंद्रकुमार मिश्रा यांनी सदर उपक्रम हा स्तुत्य असून पर्यावरण जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. वाल्मिक परहर यांनी जागतिक पर्यांवरण दिन जगभर साजरा करण्यात येत आहे. पर्यावरणाचा -हास होत असल्याने आज समाजामध्ये पर्यावरणविशयक जनजागृती करणे गरजेचे आहे. खरे तर वृक्षारोपणाबरोबच वृक्षसंवर्धन ही आज काळाची गरज बनली असून महाविद्यालयीन युवकांनी आपापल्या परिसरात निदान एक तरी झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रिंगी, बेल, आवळा आदी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. शेवटी उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, एन.एस.एस.स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.