loader
Breaking News
Breaking News
Foto

खारपाडा येथे भरधाव डंपरची स्कूटीला भीषण धडक; २२ वर्षीय युवकासह १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

संगलट (खेड )(प्रतिनिधी )- मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा गावाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात स्कूटीवरील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवार रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा गाव हद्दीतील पोलीस चौकीसमोरील पेण-पनवेल मार्गावर डंपर क्रमांक MH 26 M 2604 आणि स्कूटी क्रमांक MH 03 FE 5142 यांच्यात अपघात झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डंपर चालक गौतम लक्ष्मण महतो (रा. झारखंड) याने मद्यपान करून हायगयीने व बेदरकारपणे वाहन चालविल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरील स्कूटीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात स्कूटीवरील आदित्य किशोर बल्लाळ (वय २२ वर्षे) व यश मुकेश बल्लाळ (वय १२ वर्षे) या दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दोघेही मूळचे पुनर्वसन खेरसोत, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील असून सध्या विक्रोळी, मुंबई येथील भीमचाळ परिसरात राहत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सकपाळ करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg