दापोली (प्रतिनिधी) : गिम्हवणे दुबळेवाडी येथील सिकंदर निवास संकुल आवारातील एक लोखंडी विदयुत खांब जमिनीकडील भागात पार गंजून गेला होता. सदर विदयुत खांबावर काही कामानिमित्त विदयुत कर्मचाऱ्यांना खांबावर चढताना धोक्याचे झाले होते. पावसाळयातील वादळ वाऱ्यात सदरचा विद्युत खांब कोसळून पडण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे सदरचा धोकादायक विद्युत खांब बदलण्यासाठी विदयुत महावितरण कंपनी कार्यालयातील सहाय्यक अभियंता नितिन राऊत यांची भेट घेऊन येथील रहिवाशांनी विद्युत महावितरण अधिकाऱ्यांना परिस्थिती समजावून सांगितली.
त्याची तत्काळ दखल घेत सदरचा धोकादायक विद्युत खांब महावितरणने बदलण्याचे महत्वाचे काम केले. या त्यांच्या सजग कामाचे येथील रहिवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दापोली तालुक्यातील गिम्हवणे दुबळेवाडी येथील रामचंद्र दुबळे यांच्या सिंकदर निवासातील आवारात विदयुत महावितरण कंपनीचा एक लोखंडी खांब होता. सदरचा लोखंडी विदयुत खांब जमिनीच्या बाजूने पुर्णतः गंजून गेल्याने विद्युत खांबावर चढून काही कामे करण्यास विदयुत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धोक्याचे झाले होते. तसेच खांब वारा वादळात कोसळून पडण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे येथील रहिवाशांना ते धोक्याचे होते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन कर्मचारी आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून दापोली शहरातील काळकाई कोंड येथील विदयुत महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन तेथील कार्यालयात कार्यरत असलेले विद्युत महावितरणचे अधिकारी सहाय्यक अभियंता नितिन राऊत यांची भेट घेऊन त्यांना रहिवाशांनी परिस्थिती समजावून सांगितले असता त्यांनी याची त्वरेने दखल घेत सदरचा धोकादायक स्थितीतील विद्युत खांब बदलून नव्याने खांब उभा करून नागरिकांच्या मागणीची सजगतेने घेतलेल्या दखलीमुळे गिम्हवणे दुबळेवाडी येथील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. त्यामुळे विदयुत महावितरण कंपनीच्या कामाचे समाधान व्यक्त केले जात आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.