खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथील महानगर गॅस सीएनजी पंपावर शनिवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात शहरातील उद्योजक उत्तमकुमार सुखराज जैन (वय ५४) यांच्या कारची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहा अज्ञात व्यक्तींविरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, उत्तमकुमार जैन हे ३१ मे रोजी रात्री सुमारे १२.२९ वाजता आपल्या टाटा नेक्सॉन (एमएच ०८ बीई ८१५१) या कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी कळंबणी येथील गॅस पंपावर गेले होते. पंपावर वाहनांची मोठी रांग असल्याने त्यांनी आपली कार रांगेत उभी केली होती.
मात्र गॅस भरण्यास वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यानंतर ते कार बाहेर काढत असताना मागून आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या वाहनाला घासल्याने कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. यानंतर स्विफ्ट डिझायरमधील काही व्यक्ती खाली उतरून जैन यांच्याशी वाद घालू लागले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर संबंधितांनी कारच्या काचांवर ठोसे मारत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच वाहनाच्या नुकसानभरपाईच्या नावाखाली एक लाख रुपयांची मागणी देखील केल्याचे यावेळी समोर आले आहे. जैन यांनी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातातील मोबाईल फोन आणि कारची चावी हिसकावून घेण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
त्यानंतर सहा जणांनी त्यांना घेराव घालत धमकावले. आम्ही कोण आहोत हे तुला माहीत नाही, तुझा गेम करू, अशी धमकी दिल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही परिचितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद अधिकच वाढला आणि संबंधितांनी जैन यांच्या कारची समोरील काच देखील फोडली. तसेच त्यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा सांगत मोबाईल परत फेकून देत संबंधित सहा जण घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे सीएनजी पंपावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, खेड पोलिसांनी सहा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.