loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रवाशास वेळेत मिळाला जीवनदानाचा आधार

पनवेल : मुंबई (परेल) येथून तुळजापूरकडे जाणारी एस.टी. बस क्रमांक MH 13 CU 6335 ही दिनांक ३१/०५/२०२६ रोजी पनवेल येथील शिवशंभू नाका सिग्नलवर थांबली असता बसमधील अंदाजे ४५ वर्षीय पुरुष प्रवाशास अचानक फिट आली. त्यानंतर त्याला तीव्र चक्कर येऊन तो बसमध्येच कोसळला व त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. ही गंभीर बाब बसमधील एस.टी. कंडक्टरच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ शिवशंभू नाका सिग्नलवर कर्तव्य बजावत असलेले पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अमीर मुलाणी व पोलीस शिपाई सुरेश जौजाळ यांना माहिती दिली. सदर बाब समजताच पोलीस अंमलदारांनी प्रसंगावधान राखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली व सिग्नलवरील वाहतूक सुरळीत ठेवत संबंधित प्रवाशास मदत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर एस.टी. कंडक्टर तसेच वाहतूक पोलिसांच्या मदतीने संबंधित प्रवाशास बसमधून सुरक्षितरित्या खाली उतरविण्यात आले. सिग्नलवरून जाणारी एक ऑटो रिक्षा थांबवून सदर व्यक्तीस तातडीने मार्केट यार्ड, पनवेल येथील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस अंमलदार, एस.टी. कंडक्टर व रिक्षाचालक यांनी प्रत्यक्ष सोबत जाऊन मानवतेचे दर्शन घडवत आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळवून दिली. आधार हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तेथील डॉक्टरांनी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न करता संबंधित व्यक्तीस तात्काळ दाखल करून आवश्यक उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे व योग्य वैद्यकीय उपचारांमुळे संबंधित व्यक्ती शुद्धीवर आली असून तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. तसेच संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली आहे. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पनवेल पोलीस स्टेशनला कळविण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार, एस.टी. कंडक्टर, रिक्षाचालक तसेच आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतावादी सेवाभावाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे संबंधित प्रवाशास वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले व त्याचा जीव वाचविण्यास मोठी मदत झाली. त्यानंतर एस.टी. बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg