loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोरे नं. २ येथे वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृषि महाविद्यालय, सांगुळवाडी यांच्या वतीने लोरे नं. २ येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कृषिदूतांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, जिल्हा परिषद सदस्या सिद्धी रितेश सुतार, लोरे सरपंच विलास शिवराम नावळे, महेंद्र रावराणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिल नराम, माजी तंटामुक्त अध्यक्ष सुरेंद्र रावराणे, ग्रामसेवक कस्तुरे, पोलीस पाटील लवू रावराणे तसेच कृषी सेवक भुजंग आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी महाविद्यालय, सांगुळवाडीचे प्राचार्य डॉ. एस. सी. होळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम समन्वयक प्रा. व्ही. डी. कदम व कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. आर. धोपट यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत विशाल दरेकर, प्रथमेश खराडे, विराज पाटकर, प्रज्वल खेडकर, विश्वजीत भुजबळ, तेजस काटकर, यश रोचकरी आणि अवधूत चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाच्या माध्यमातून हरित भविष्याची दिशा या उपक्रमातून देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg