loader
Breaking News
Breaking News
Foto

सासोली येथे जखमी नागराजाला जीवदान; वनविभाग आणि रॅपिड रेस्क्यू टीमची कौतुकास्पद कामगिरी

दोडामार्ग (प्रतिनिधी) -सासोली येथे रस्त्यावर अत्यंत गंभीर, रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या कोब्रा (नाग) जातीच्या विषारी सापाला वनविभाग आणि रॅपिड रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. तब्बल काही दिवस चाललेल्या यशस्वी उपचारांनंतर आज, ६ जून रोजी या नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी सासोली येथील मुख्य रस्त्यावर एक नाग अत्यंत जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत स्थानिक नागरिकाला आढळून आला होता. वन्यजीव प्रेमी सर्वेश पेडणेकर यांनी कोणतीही घाई न करता प्रसंगवधान दाखवले. त्यांनी तात्काळ सिंधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत व भाग्यश्री परब यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आणि मदत मागितली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दोडामार्ग वनविभाग आणि 'रॅपिड रेस्क्यू टीम'ने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत काळजीपूर्वक या जखमी नागाला रेस्क्यू (ताब्यात) करण्यात आले. नागाची प्रकृती चिंताजनक असल्याने अमृतसिंग सर तसेच चरण यांच्या वैद्यकीय मार्गदर्शनाखाली त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. ​योग्य औषधोपचार आणि देखभालीमुळे नागाच्या जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि तो पुन्हा निसर्गात फिरण्यासाठी सज्ज झाला. अखेर आज, ६ जून रोजी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या व वन्यजीव रक्षक संजय सावंत यांच्या उपस्थितीत त्याला मानवी वस्तीपासून दूर, त्याच्या हक्काच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. वनविभाग, रॅपिड रेस्क्यू टीम आणि सजग नागरिकांच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे एका देखण्या वन्यजीवाचे प्राण वाचले असून, परिसरातील वन्यजीव प्रेमींकडून या कामगिरीचे कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

दोडामार्ग तालुक्यात वनविभागाची 'रॅपिड रेस्क्यू टीम' २४ तास कार्यरत आहे. परिसरात कुठेही जखमी, अडचणीत सापडलेले वन्यजीव किंवा साप आढळल्यास नागरिकांनी स्वतःच्या जिवाचा धोका पत्करू नये अथवा प्राण्याला इजा करू नये. पथक प्रमुख बाबू वरक, जतीन फटकारे, लाडू गवस, सर्वेश चव्हाण, नागेंद्र परब ​"वन्यजीव संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे!"

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg