loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर अनिल मरकड यांचेही निधन; मुलगा चिन्मयचे पितृछत्र हरपल्याने झाला पोरका

दापोली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे ३० मे रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचे मंगळवारी ९ जून रोजी उपचारादरम्यान निधन झाले. यापूर्वी याच अपघातात त्यांची पत्नी सुवर्णा मरकड आणि कन्या अनुश्री यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कोकण कृषी विदयापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड हे आपल्या कुटुंबासह नगर येथील आपल्या मूळ गावी गेले होते. ते सुट्टी घालवून दापोलीकडे परत येत असताना त्यांच्या क्रेटा कारची उभ्या असलेल्या एका डंपरला पोलादपूर येथील हॉटेल बालाजी नजिक जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात त्यांच्या पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा आणि स्वतः मरकड यांना मोठी दुखापत झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान अनिल मरकड यांना आणि त्यांच्या मुलाला अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले होते. मुलगा चिन्मय याच्या हाताला दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे. तर अनिल मरकड यांना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील १० दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने अखेर मंगळवारी ९ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. स्टेट बँकेत कार्यरत असलेल्या अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा गव्हाणे (मरकड) आणि त्यांची कन्या अनुश्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता अपघातात गंभीर जखमी झालेले स्वतः अनिल मरकड यांचा मृत्यू झाल्याने मुलगा चिन्मय मातृ पितृ छत्र हरपल्याने पोरका झाला आहे.

टाईम्स स्पेशल

दापोली शहराला लागूनच असलेल्या जालगाव येथील मंगलभूमी अपार्टमेंटमध्ये मरकड कुटुंबियांचे वास्तव्य होते. पत्नी आणि मुलीच्या दुर्दैवी निधनाला १० दिवस होत नाहीत तोच अनिल मरकड यांच्या मृत्यूचे वृत्त मंगलभूमी अपार्टमेंटमधील रहिवाशांना समजताच अपार्टमेंटमधील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली. तसेच कोकण कृषी विद्यापीठातील त्यांचे सहकारी यांनीही तीव्र शोक व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg