loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श शिक्षिका समीरा कारविणकर यांचा सेवापूर्ती समारंभ

चिपळूण : समीरा शौकत कारविणकर या अत्यंत कार्यकुशल, सेवाभावी, प्रेमळ, उपक्रमशील तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक विकासासाठी स्वत:ला झोकून देणार्‍या आदर्श शिक्षिका सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी तब्बल ३७ वर्षे ज्ञानदानाची सेवा केली. त्यांच्या कारकिर्दीत कालुस्ते उर्दू शाळेला आदर्श शाळा होण्याचा बहुमान ही मिळविलेला आहे. त्यांनी आपली शैक्षणिक सेवा चिपळूण तालुक्यात केली आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार रुजवले असल्याने त्यांचे आजी माजी विद्यार्थी, पालक, वेगवेगळ्या माध्यमाचे शिक्षक, त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक, अनेक अधिकारी पदाधिकारी यांनी बहूसंख्येने उपस्थित राहून त्यांचा यथोचित सन्मान करुन शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमासाठी चिपळूण येथील नगरसेविका नसरीन खडस, ज्येष्ठ शिक्षिका सफिया मोगल, रत्नागिरी जिल्ह्यातील समाजसेवक एजाज इब्जी, रिझवाना इब्जी, अन्वर कुरवले, रेहाना वलेले, शरफत वलेले, सलीम गडकरी, बशीर अलवारे, मुश्ताक अष्टीकर, इक्बाल दळवी, निलम दळवी, नुरजहाँ खलफे, राहीन नेवरेकर, नाईला खडस आदी बहूसंख्येने शिक्षक तसेच अनेक ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. शौकत कारविणकर आणि त्यांच्या सौभाग्यवती समीरा कारविणकर यांना भावी आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg