loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील काळकाई कोंड परिसरात गुलमोहराचे झाड कोसळले; वाहनांसह मालमत्तेचे मोठे नुकसान

दापोली - शहरातील काळकाई कोंड परिसरातील अबीदा अपार्टमेंट कंपाऊंडलगत असलेले भलेमोठे गुलमोहराचे झाड आज सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत अबीदा अपार्टमेंटच्या आवारात पार्किंग करून ठेवलेल्या ओमनी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच इमारतीच्या टेरेसवरील पत्रे तुटून खाली पडली असून ड्रेनेज पाईपलाईनही नुकसानग्रस्त झाली आहे. झाड कोसळताना वीज खांबही तुटल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित झाड धोकादायक अवस्थेत असल्याबाबत यापूर्वी अनेक वेळा संबंधित शासकीय विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे वेळेत लक्ष न दिल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. "प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती तर आमचे आर्थिक नुकसान टळले असते," अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित विभागाकडून नुकसानीचा पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg