loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रतिरंग चेस अकॅडमीच्या खेळाडूंना फिडे मानांकन व विविध स्पर्धांमध्ये यश

खेड: (प्रतिनिधि) - प्रतिरंग चेस अकॅडमीच्या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या विविध जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरीच्या जोरावर विविध पारितोषिके आणि बुद्धिबळाचे फिडे मानांकन मिळवून यश संपादन केले आहे. प्रतिरंग चेस अकॅडमी-चिपळूणचे संस्थापक व प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय मानांकित प्रवीण सावर्डेकर व सौ. रश्मी प्रवीण सावर्डेकर यांनी घडविलेले चिपळूणमधील बुद्धिबळपटू व सुपुत्र ओंकार सावर्डेकर याने पुणे येथील इंटर युनिव्हर्सिटी-पुणे बुद्धिबळ स्पर्धेत मेरीटमध्ये सहावा कमांक पटकावला. तसेच आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे मानांकन स्पर्धेत बिलो-१६०० कॅटेगरीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावतानाच आपल्या फिडे मानांकनात ७० गुणांची वाढ केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच अकॅडमीचे खेळाडू कु. ओम चव्हाण, कु. देवेश थत्ते, कु. आदित्य कांबळे, कु.संकल्प उपरे व ओम खामकर यांनीही विविध जिल्हा व राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेत चमकदार कामगिरीच्या जोरावर बक्षिसे पटकावून फिडे मानांकन मिळविण्यासाठीची आवश्यक कामगिरी पूर्ण केली आहे. अकॅडमीच्या या यशाबद्दल प्रवीण सावर्डेकर व सौ. रश्मी प्रवीण सावर्डेकर यांचा लायन्स क्लब तर्फे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg