loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात अंडरपाससाठी संघर्ष समितीचा इशारा; २५ जूनला रास्तारोकोचा इशारा

लांजा (वार्ताहर) - लांजा शहरात तहसील कार्यालय, लांजा एस. टी. डेपो आणि लांजा उपशेट्येवाडी या तीन ठिकाणी अंडरपास ठेवावेत या मागणीसाठी लांजा तालुका संघर्ष समितीच्यावतीने आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवार दि. २५ जूनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा २५ जून रोजी रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा लांजा शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी ८ जून रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आहे. याबाबतची पत्रकार परिषद सोमवारी लांजा येथील कुलकर्णी काळे छात्रालय या ठिकाणी पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये अंडरपासच्या प्रश्नावर स्पष्ट मत मांडण्यात आले. यावेळी चंद्रकांत परवडी त्यांनी सांगितले की, गेल्या 19 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग रखडलेला आहे. लांजा शहराचा विचार करता यापूर्वी लांजा कुक्कुटपालन ते एसटी डेपो असा उड्डाणपूल होता. त्यानंतर मात्र त्यात कसा बदल झाला आणि कोणी बदल केला? कोणाच्या दबावामुळे यामध्ये बदल झाला हे आपल्याला माहित नाही. परंतु यामुळे सध्या लांजा शहरातील नागरिकांसमोर अनेक प्रश्न उभे टाकले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा तहसील कार्यालय या अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या ठिकाणी धारावाची भिंत उभारल्याने महामार्गाचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अंडरपास असणे अत्यंत गरजेचे होते. कारण या ठिकाणी लांजा हायस्कूल असून हायस्कूचे सुमारे ३००० विद्यार्थी व मराठी शाळेचे ६०० विद्यार्थी नेहमी ये - जा करत असतात. त्यामुळे याठिकाणी अंडरपास नसल्याने या सर्व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. याठिकाणी तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पोलिस ठाणे, ग्रामिण रुग्णालय, माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच अन्य शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, झेरॉक्स सेंटर सरकारी दस्तऐवज तयार करण्याचे सेंटर हे सर्व एकाच ठिकाणी आहेत. पण या ठिकाणी अंडरपास न ठेवल्याने या कार्यालयांची विभागणी होणार आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींबरोबरच अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष झाल्याने हा प्रश्न आ वासून उभा टाकला आहे. तसेच लांजा उपशेट्येवाडी येथे येण्या - जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील सुमारे १५०० ते २००० नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. तसेच लांजा एस. टी. डेपो या ठिकाणी एस. टी. गाड्यांना महामार्ग ओलांडून पलीकडे जाताना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे या तीनही ठिकाणी अंडरपास ठेवावेत अशी आग्रही मागणी असून या मागणीचा २५ जूनपर्यंत संबंधित प्रशासनाने याचा विचार करून योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा यानंतर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

रास्तारोको आंदोलनानंतरही हा प्रश्न मार्गी लागला नाही तर संघर्ष समितीच्यावतीने मुंबई हायकोर्टात या विरोधात दाद मागण्यात येईल असेही यावेळी पत्रकार परिषदेचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या पत्रकार परिषदेला चंद्रकांत परवडी, सुधाकर कांबळे, प्रकाश लांजेकर, वसंत घडशी, मयेकर, बाबा धावणे, मोहन तोडकरी, अभिजीत राजेशिर्के, दिलीप चौगुले, नाना मानकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg