loader
Breaking News
Breaking News
Foto

अपघातामध्ये मृत्यूमुखी पावलेल्या गंगाराम कदम यांच्या कुटुंबीयांना लायन्स क्लबने दिला आधार

खेड - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने नांदिवली या गावातील खेड भरणा रोडवर मागील चार दिवसांपूर्वी रोड अपघातामध्ये मृत्यूमुखी पावलेल्या कैलासवासी गंगाराम कदम यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांची भेट घेतली. लायन्स क्लबच्या प्रथेप्रमाणे ज्या घरातील करता पुरुष जातो त्या ठिकाणी लायन्स क्लब नेहमीच मदतीचा हात पुढे करत असते. त्याच अनुषंगाने लायन जितेंद्र भिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त या कुटुंबाला महिन्याभराचे जिन्नस भेट म्हणून देण्यात आले. तसेच ज्यांचा वाढदिवस आहे असे पंकजभाई शहा यांच्या वाढदिवसानिमित्त रोख स्वरूपात मदत या कुटुंबाला करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे राहिलेल्या कुटुंबाची अवस्था एकदम बिकट होऊन जाते. त्या परिस्थितीत एक हात मदतीचा या अनुषंगाने लायन्स क्लब काम करीत असते. कैलासवासी नवीन कदम यांच्या पश्चात त्यांचे 80 वर्षाची आई वडील पत्नी व दहावीत शिकत असलेली मुलगी असे कुटुंब आहे. या मुलीच्या शिक्षणाची ही जबाबदारी लायन्स क्लब ने उचलली असून जे जे शक्य असेल ते मदत करण्याचं त्या कुटुंबाला लायन्स क्लबने आश्वासित केलं. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, जितु भिलारे, विवेक कदम, उत्तम कांबळे सर, अनाजी चव्हाण शेठ व ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg