loader
Breaking News
Breaking News
Foto

बांद्यात घरासमोर उभी दुचाकी चोरट्यांनी पळवली

बांदा (प्रतिनिधी) -बांदा येथील आळवाडी परिसरात घराशेजारी उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रथमेश गवळी (वय २८, रा. बांदा-आळवाडी) यांच्या मालकीची दुचाकी १२५ (क्र. एमएच-०७ एएन-६२९७) मंगळवारी सायंकाळी त्यांच्या घराशेजारी उभी करण्यात आली होती. रात्री सुमारे १२ वाजेपर्यंत ही दुचाकी तेथे असल्याचे पाहण्यात आले. मात्र बुधवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बाहेर पाहिले असता दुचाकी जागेवर नसल्याचे निदर्शनास आले.

टाईम्स स्पेशल

दुचाकीचा परिसरात शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने प्रथमेश गवळी यांनी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार गुरु परब करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg