वैभववाडी (प्रतिनिधी) - आई व पत्नीला मारहाण करणार्या सडूरे येथील एका तरुणाविरुद्ध वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयूर दशरथ सुतार (वय ४०, रा.सडूरे गावठणवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी मयुरी मयूर सुतार (वय ३८, रा.सडूरे गावठणवाडी) यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २ जून २०२६ रोजी रात्री मयुरी सुतार यांच्या मोबाईलवर त्यांच्या भावाचा फोन आला होता. त्या भावाशी बोलत असताना तुझ्या भावाने माझी विचारपूस का केली नाही? या कारणावरून मयूर यांनी पत्नीशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या प्रकारानंतर मयूरी सुतार यांनी रात्री ११२ क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवली. तक्रारीची दखल घेत वैभववाडी पोलिसांनी सडूरे गावठणवाडी येथे जाऊन दोघांनाही समज देत शांत केले व सकाळी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगितले. मात्र बुधवारी सकाळी मयुरी सुतार या कामासाठी घराबाहेर पडत असताना मयूर सुतार यांनी पुन्हा शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मयुरी यांना सोडवण्यासाठी मयूर यांची आई प्रफुल्लता सुतार पुढे आल्या. त्यावेळी आरोपीने चिवा काठीच्या बांबूने पत्नी व आई या दोघांनाही मारहाण केली.
या मारहाणीत दोघी गंभीर जखमी झाल्या. जखमींना ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयूरी सुतार त्यांच्या फिर्यादीवरून वैभववाडी पोलिसांनी मयूर दशरथ सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.