loader
Breaking News
Breaking News
Foto

ओटवणे येथे आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवपुतळ्याचा लोकार्पण सोहळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - तालुक्यातील ओटवणे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला शिवप्रेमी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार निलेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती अधोरेखित केली. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीत आपण जन्मलो, हे आपले भाग्य आहे," असे सांगत त्यांनी शिवरायांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या मनोगतात ओटवणे गावाविषयीचे प्रेम व्यक्त केले. व्यस्त वेळापत्रक असूनही या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहता आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी परिश्रम घेणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आणि ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी इतिहासाचा आढावा घेत शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे विवेचन केले. पत्रकार सीताराम गावडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख केला.

टाईम्स स्पेशल

​या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गावकर, सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, रवींद्र गावकर, सगुण गावकर, बबलू गावकर, सोनू दळवी, रवींद्र म्हापसेकर, सरमळेचे सरपंच विजय गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, गुंडू जाधव यांसह इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ शृंगारे व शुभम धुरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन दशरथ शृंगारे यांनी केले. शिवरायांच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg