रत्नागिरी : प्रभाग क्रमांक 14 मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी त्यांची रत्नागिरी शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. पक्षाची विचारधारा व ध्येय धोरणांना अधीन राहून पक्ष वाढीसाठी यथाशक्ती प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नियुक्ती पत्र देताना व्यक्त करण्यात आली. आज शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी आशिष मोरे म्हणाले, "मी जबाबदारीने काम करील. पक्षाची विचारधारा मानून संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन." शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी विश्वास व्यक्त केला की, "आशिष मोरे यांचा जनसंपर्क आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून केलेले काम याचा निश्चितच पक्षाला फायदा होईल." यावेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, मनोज पाटणकर, राजू भाटलेकर, डॉ. ऋषिकेश केळकर, निलेश आखाडे, नगरसेवक बाबू सुर्वे, भक्ती दळी आदी. उपस्थित होते.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.