संगलट (खेड )(प्रतिनिधी) - दापोली समुद्रकिनारी वसलेले आणि कोळी बांधवांची मोठी वस्ती असलेले पाजपंढरी गाव सध्या भीषण पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. एका बाजूला अथांग समुद्राचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला तळ गाठलेल्या विहिरी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्याअभावी ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बांधतीवरे नळपाणी पुरवठा योजनेतून नियमित पाणी मिळत नसल्याने ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुमारे पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर केवळ चार हंडे पाणी मिळत असून तेही कुटुंबाच्या मूलभूत गरजांसाठी अपुरे ठरत आहे. त्यामुळे महिलांना पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. अनेक वेळा लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांचा शारीरिक आणि मानसिक ताण वाढला आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने वयोवृद्ध, अपंग व्यक्ती तसेच लहान मुलांचे हाल अधिकच वाढले आहेत. उन्हाच्या कडाक्यात पाण्यासाठी होणारी धावपळ ग्रामस्थांच्या आरोग्यावरही परिणाम करत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने टँकरचे किंवा विकतचे पाणी घेणे अनेक कुटुंबांना परवडणारे नाही.
"पाणी विकत घ्यायचे, पण पैसे आणायचे कुठून?" असा हतबल प्रश्न महिलांकडून व्यक्त होत असून त्यांच्या डोळ्यांतील वेदना परिस्थितीची तीव्रता अधोरेखित करत आहेत. दरम्यान, पाज पंढरी गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची, नळपाणी योजनेतील त्रुटी दूर करण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. पाणीटंचाईचे हे गंभीर संकट लक्षात घेऊन संबंधित विभागांनी तातडीने दखल घ्यावी, अन्यथा येत्या काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.