मालवण (प्रतिनिधी) - नवीन घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार आता नागरिकांना घरातूनच कचऱ्याचे ४ वेगवेगळ्या भागांत वर्गीकरण करून देणे सक्तीचे करण्यात आले आहे. मालवण हे पर्यटन शहर असल्याने समुद्रकिनारे आणि शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात नागरिकांमध्ये याबाबत व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी येथे केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन 'घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६' ची शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मालवण नगरपरिषदेत एका विशेष मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी उपस्थित नगरसेवक, पालिका अधिकारी आणि शहर समन्वयक यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 'माझी वसुंधरा' व 'स्वच्छ भारत २.०' अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाची आणि कचरा वर्गीकरणाची सामूहिक स्वच्छता शपथ घेतली.
यावेळी नगराध्यक्षा वराडकर म्हणाल्या की, " कचऱ्याचे वर्गीकरण ४ प्रकारांत करावे लागेल. यात ओला कचऱ्यामध्ये स्वयंपाकघरातील कचरा, खरकटं अन्न आदी, सुका कचऱ्यामध्ये कागद, प्लास्टिक, काच आदी, सॅनिटरी कचऱ्यामध्ये डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स आदी, घरगुती घातक कचऱ्यामध्ये जुनी औषधे, सीएफएल/एलईडी बल्ब, बॅटऱ्या आदींचा समावेश असेल. शहरातील ज्या हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना किंवा सोसायट्यांमध्ये रोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो, अशा मोठ्या कचरा उत्पादकांना आता स्वतःचा ओला कचरा स्वतःच्याच आवारात खत प्रकल्प उभारून जिरवावा लागेल. नगरपालिका अशा संस्थांचा ओला कचरा उचलणार नाही, तसेच त्यांना केंद्रीय पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक राहील, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या या नवीन नियमाचा हवाला देत नगराध्यक्षांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. यापुढे वारंवार सांगूनही कचरा मिक्स देणाऱ्या किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिक व दुकानदारांवर नगरपरिषदेतर्फे कडक आर्थिक दंड आकारण्यात येईल. या महत्त्वपूर्ण बैठकीला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक, शहर समन्वयक, स्वच्छता निरीक्षक आणि नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालवण शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.