loader
Breaking News
Breaking News
Foto

प्लास्टिक मुक्त अभियानाची पद्मसाई रिसॉर्ट खेर्डी येथे सांगता

खेड - प्लास्टिक मुक्त अभियानाची एसटी डेपो ते खेर्डी तिठा या गटाची सांगता पद्मसाई रिसॉर्ट खेर्डी येथे झाली. यावेळी पद्मसाईचे सर्वेसर्वा सुनील दळवी व जि.प. माजी अध्यक्षा रोहिणीताई दळवी यांच्या वतीने या गटातील सर्व कर्मचाऱ्यांना चहापान नाश्ता यांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रिसॉर्टचे मालक सुनील दळवी यांच्या वतीने सभापती उन्मेष राजे, गट विकास अधिकारी गणेश मंडलिक, तसेच जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी शेडगे, उपसभापती नम्रता तोडणकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे, सदस्या सुचिता महाडिक, नोडल अधिकारी डी. एस. मर्चंडे, सहाय्यक नोडल अधिकारी आर.आर.कोडापे तसेच अंगणवाडी प्रकल्प अधिकारी दापोलीच्या अंकिता महाडिक, निरंकारी मंडळाचे पदाधिकारी सुभाष काष्टे यांचाही पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सामाजिक पदाधिकारी अमित पारदुले, राजेश झगडे, विनय शेडगे यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी, निरंकारी मंडळाचे अधिकारी व सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 15 ते 20 टन प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला त्यामुळे अभिनंदन करण्यात आले. या सांगता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश कदम यांनी केले. यावेळेस अध्यक्ष प्रदूषण महामंडळ सिद्देश कदम यांनी सुनील दळवी यांच्याशी मोबाईवरून संपर्क करून सदर संकल्पनेचे कौतुक केले असून यापूढे या संकल्पनेला आपले सहकार्य लाभेल असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg