loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर : अंजनवेलची सायली खडपे 'एलएलबी' परीक्षेत उत्तीर्ण

​गुहागर : जिद्द आणि कष्टाच्या जोरावर अंजनवेल येथील एका शेतकरी कन्येने मुंबईत शिक्षण घेत वकिलीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. अंजनवेल येथील शेतकरी संदीप खडपे यांची कन्या कू.सायली संदीप खडपे हिने 'एलएलबी' LLB परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. ​वडिलांनी अंजनवेल येथे शेती करून,अपार कष्टाने मुलीला मुंबईत उच्च शिक्षणासाठी पाठवले होते. सायलीनेही वडिलांच्या कष्टाचे चीज करत वकिलीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन त्यांचे वकील बनवण्याचे स्वप्न साकार केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सायलीच्या या यशाची दखल घेत शृंगारतळी व पाटपन्हाळे येथील मान्यवरांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. शृंगारतळी येथील पवार मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र पवार, उद्योजक नासीम साल्हे आणि पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच असीम साल्हे यांनी सायलीचे मनापासून अभिनंदन करून तिच्या पुढील वकिलीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील मुलीने मुंबईत जाऊन मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. ​या सत्कार सोहळ्याप्रसंगी डॉक्टर राजेंद्र पवार, पाटपन्हाळेचे उपसरपंच आसिम साल्हे, उद्योजक नासीम साल्हे, सायलीचे वडील संदीप खडपे, गजानन जाधव, सामाजिक कार्यकर्ते गणेश मोरे आणि मयुरेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सायलीच्या या यशामुळे परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg