loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग म्हावळणकरवाडी येथे मजूरीचे काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचा आकस्मिक मृत्यू

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग म्हावळणकरवाडी येथे शेतात काम करणाऱ्या रघुनाथ दिगंबर खिलारी वय वर्षे ४३ रा.सद्या म्हावळणकरवाडी मूळ गाव शेनवडी जि. सातारा हा शेखर विष्णू फाटक यांच्या शेत मांगरात मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली. शेखर विष्णू फाटक यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यातील मयत हा मजुरीचे काम करायचा व तो फिर्यादी यांचे म्हावळणकरवाडी येथील शेतमानगर मध्ये राहण्यास होता. आज सकाळी तो उशिरापर्यंत झोपलेल्या स्थितीत मिळून आला म्हणून त्याला उठवायचा प्रयत्न केला असता त्याची काहीच हालचाल दिसुन आली नाही म्हणून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक भगत, पोलीस केरकर, पोलीस नाईक यांनी भेट दिली अधिक तपास सावंत करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg