loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा दापोलीच्या वतीने वृक्षारोपण आणि वृक्ष वाटपाचा कार्यक्रम

दापोली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी दापोलीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत टाळसुरे तसेच नवानगरातील सर्व रहिवाशांना वृक्ष वाटप करण्यात आले. तर काही ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाजपा दापोली तालुका अध्यक्षा जया साळवी, भाजपाचे तालुका सरचिटणीस संदीप केळकर, धीरज पटेल, अजय कदम, सचिन होडबे, विजय माळी, वैष्णवी वेल्हाळ, ओमकार वेल्हाळ, विवेक भावे, लहू साळुंखे आदि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व लक्षात घेता सामाजिक बांधिलकीच्या भावनेने तालुक्यातील टाळसुरे तसेच शहरातील नवानगर परिसरात काजू, फणस, जांभूळ, आंबा, कोकम, सोनचाफा आदि फळझाडे तसेच फुलझाडांचे वाटप दापोली तालूका भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले. त्याचप्रमाणे भाजपा पदाधिकारी संदिप केळकर, जया साळवी आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात पार पडला. भाजपाच्या या सामाजिक कामाचे तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg