loader
Breaking News
Breaking News
Foto

समाज जागृती मंच, दोडामार्गतर्फे ६ जून रोजी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम

दोडामार्ग : समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने समाज जागृती मंच, दोडामार्ग यांच्यावतीने शनिवार, दिनांक ६ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता स्नेह रेसिडेन्सी हॉल, दोडामार्ग येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये छत्री, दप्तर, वह्या, कंपास पेटी आदी साहित्याचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते म्हणून आयु. महेश जाधव (घोटगे-भिमनगर, दोडामार्ग) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. समाज जागृती मंचचे अध्यक्ष दिपक जाधव, उपाध्यक्ष गोविंद कदम, सचिव संतोष कदम, सहसचिव शंकर जाधव, खजिनदार महेश जाधव तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सभासद कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समाज जागृती मंचच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg