loader
Breaking News
Breaking News
Foto

वाशी तर्फे देवरुख येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - देवरुख जवळील वाशी तर्फे देवरुख येथे ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, हिवताप (मलेरिया) प्रतिरोध महिन्यानिमित्त आरोग्यविषयक जनजागृती तसेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. परिसर स्वच्छता मोहिमेत प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. तसेच वाशी मराठी शाळेपासून झेपले घरापर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोग्य उपकेंद्राच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याशिवाय १ जून ते ३० जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी उपसरपंच सुनिल सावंत यांनी ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की, गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घराभोवतीचा परिसर, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करून गाव स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी ‘एक व्यक्ती – एक झाड’ हा संकल्प स्वीकारून वृक्षारोपण करावे.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमास सरपंच निकिता करंडे (प्रशासक), उपसरपंच सुनिल सावंत, ग्रामपंचायत सदस्या व माजी सरपंच अनुष्का सावंत, ग्रामविकास अधिकारी रविंद्र लोटणकर, आरोग्य सेवक विजय राऊत, अंगणवाडी सेविका सुप्रिया सावंत व जयश्री गोपाळ, आरोग्य सेविका प्रियांका इंगळे, अंगणवाडी मदतनीस पूजा कांबळे, प्रदीप करंडे, ऋषिकेश वास्कर, आशा सेविका मनीषा सावंत, उपकेंद्र वाशीच्या मदतनीस रिया रावणंग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg