वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जानवळे बैकरवाडी येथील सुपुत्र स्वप्नील सुरेश बैकर याची पोलीस भरतीमध्ये मुंबई शहर येथे निवड झाल्याने जानवळे गावाच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. मुंबई पोलीसमध्ये निवड झालेल्या स्वप्निलचे इयत्ता १ली ते ४ थी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानवळे नं २ येथे व ५ वी ते ७ वी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानवळे नं १ झाले व पुढील ८ वी ते १२ वी शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाटपन्हाळे येथे झाले. पहिल्यापासून पोलीस बनण्याच स्वप्न असल्याने मुंबईमध्ये जॉब करत प्रॅक्टिस चालू केली. २०१९ मध्ये गृहरक्षक दलात भरती झाली पण कोरोनामुळे २०२१ मध्ये त्याला भरती करण्यात आले. २०२१ ते २०२५ असे ४ वर्ष गृहरक्षक दलात काम केले.
या कालावधीत ३-४ वेळा पोलीस भरतीमध्ये सहभाग घेतला पण अपयश आले. तरीही त्याने सतत प्रयत्न चालू ठेवले. अखेर २०२६ मध्ये मुंबई शहर पोलीसमध्ये निवड झाली. या संघर्षाच्या काळात त्याच्या आईचा सर्वात मोठा वाटा आहे. मुंबईमध्ये अभ्यास करत असताना आशुतोष तरडे यांनी त्याला मोलाचं मार्गदर्शन केले. तसेच पूर्ण कुटुंबीय, मित्र परिवार यांनी ही याकाळात त्याला मदत केली. मुंबई पोलीस दलामध्ये भरती झाल्यानंतर जानवळे गावमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पोलीस दलामध्ये भरती झालेला स्वप्निल गावी आल्यानंतर शृंगारतली येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर शृंगारतली ते जानवळे अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीला पंचायत समिती सदस्य गौरव दादा वेल्हाळ, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर,तेजस कोंडविलकर उर्फ बंधू ,ओंकार संसारे ,सुशांत कोळंबेकर,प्रितेश रहाटे (रत्नागिरी पोलीस),सुदीप तुप्ते,अक्षय म्हादलेकर(रत्नागिरी पोलीस) राकेश रहाटे,भाई जांभळे,संतोष म्हैसकर,रवींद्र कोळंबेकर, सागर कोळंबेकर,सचिन कोळंबेकर,शैलेश आग्रे ,सिद्धेश आग्रे,विष्णू बैकर,रमेश बैकर,नरेश बैकर,रमेश नर्बेकर,प्रकाश बैकर, ओंकार शितप(आर्मी)निलेश धामणस्कर, विजय इतापे, रुपेश काजारे, पराग धामणस्कर,संतोष धामणस्कर,मंगेश धामणस्कर विश्वनाथ धामणस्कर, स्वप्नील वनगे आणि गावातील वाडीतील सर्व ग्रामस्त,पुरुष, महिला ,मित्र परिवार परिवार उपस्थित होते.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.