loader
Breaking News
Breaking News
Foto

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

कोर्लई,ता.८(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आयुष हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून, हॉस्पिटलने आरोग्य सेवा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यामुळे नांदगाव पंचक्रोशीसह परिसरातील पात्र रुग्णांना शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत व कॅशलेस दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

योजनेअंतर्गत पार पडलेली ही पहिली शस्त्रक्रिया ओपन रिडक्शन इंटरनल फिक्सेशन (ORIF)स्वरूपाची होती. ही शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रतीक गुंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अद्ययावत तंत्रज्ञान आणि अनुभवी वैद्यकीय पथकाच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आयुष हॉस्पिटलने अल्पावधीतच रुग्णांचा विश्वास संपादन केला असून, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विविध आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत व कॅशलेस पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील उपचार खर्चाचा मोठा भार कमी होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg