loader
Breaking News
Breaking News
Foto

दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर , बाका प्रसंग होता,काही काळासाठी उडाली एकच खळबळ

पनवेल : हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या जिवाशी खेळणारी धक्कादायक घटना पनवेल रेल्वे स्थानकाजवळ घडली. दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने काही काळासाठी एकच खळबळ उडाली. सुदैवाने मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली; मात्र या घटनेमुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. घटनेनंतर अनेक लोकल गाड्या विविध स्थानकांदरम्यान खोळंबल्या.आधीच उष्णतेचा कडाका असताना तासन्तास गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा संयम अखेर सुटला. काही प्रवाशांनी तर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने थेट रेल्वेतून उतरून रुळांवरून पायी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच जीव मुठीत धरून चालावे लागले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पनवेल स्थानक परिसरात सध्या सुरू असलेल्या विकासकामे, सुशोभीकरण आणि विविध बांधकामांमुळे प्रवाशांचे हाल आधीच शिगेला पोहोचले आहेत. स्थानकात प्रवेश करणे, फलाट बदलणे आणि बाहेर पडणे यासाठी रोजच प्रवाशांना कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत या घटनेने प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाचा कोणताही ताळमेळ नाही. गाड्या का थांबल्या, किती वेळ उशीर होणार, याची साधी माहितीही दिली जात नाही. आम्ही प्रवासी आहोत की कैदी ? अशा संतप्त शब्दांत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली. दरम्यान, दोन लोकल एकाच ट्रॅकवर कशा आल्या, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील प्रवाशांचा रोष तीव्र झाला आहे. विकासकामे, उशिरा धावणाऱ्या गाड्या, फलाटांवरील गोंधळ आणि आता थेट रुळांवरून पायपीट... हार्बर मार्गावरील प्रवाशांची ही अग्निपरीक्षा नेमकी कधी संपणार? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg