loader
Breaking News
Breaking News
Foto

गांजासह तिघांवर कारवाई; ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

खेड : तालुक्यातील मुंबके येथे गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तिघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ६७ हजार २४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४७ वाजण्याच्या सुमारास मुंबके येथील एका खोलीमध्ये गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अफजल जहीर कादरी (२४, रा. नांदगाव मोहल्ला, ता. खेड), सद्दाम अबू बकर दुदुके (२५, मूळ रा. मुंबके, सध्या रा. कोनगाव, कल्याण) आणि अवधूत राजेश घोडे (२६, रा. कोष्टी आळी, खेड) हे तिघे गांजा विक्रीसाठी बाळगून असल्याचे आढळून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छाप्यात पोलिसांनी ३६४ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा, ज्यामध्ये हिरवट पाने, फुले व बिया होत्या, असा अंमली पदार्थ जप्त केला. यासह तीन स्मार्टफोन, गांजा सेवनासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन मातीच्या चिलीम आणि प्लास्टिकच्या लहान पिशव्याही जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये गांजा, मोबाईल फोन आणि अन्य साहित्याचा समावेश असून त्याची एकूण किंमत ६७ हजार २४९ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सूरज निवृत्ती मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg