सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी, दोडामार्ग आणि मालवण येथील एसटी बस डेपो खाजगी पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्वावर विकसित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून, येत्या ऑगस्ट महिन्यात यासाठीच्या निविदा काढण्यात येणार आहेत. तसेच, डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला ३१० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत असला, तरी सध्या तरी कोणतीही तिकीट दरवाढ केली जाणार नाही, अशी महत्त्वाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी येथे दिली. परिवहन मंत्र्यांनी आज सावंतवाडी डेपोला भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात परिवहन मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, दिनेश गावडे, दोडामार्ग तालुका प्रमुख व उपसभापती गणेशप्रसाद गवस, सुधा कवठणकर, मायकल डिसोझा, अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, सभापती सुष्मिता जाधव, सचिन वालावलकर, गोपाळ गवस, राजन रेडकर, क्लेटस फर्नाडिस, गोविंद वाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
परिवहन मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी डेपोमधील स्वच्छतागृहे आणि शौचालये प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहेत. तसेच सर्व डेपोंमध्ये यांत्रिक पद्धतीने स्वच्छता राखली जाईल आणि तेथे सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सावंतवाडी एसटी डेपो हा बारामतीच्या धर्तीवर सर्व सुविधायुक्त व आधुनिक 'पोर्ट' प्रमाणे विकसित केला जाईल, ज्यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयींना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, डेपोमधील 'हिरकणी कक्ष' देखील आधुनिक करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील वाहतूक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मिनी बसेस दिल्या जाणार आहेत. यामध्ये सावंतवाडीसाठी २०, मालवण १०, दोडामार्ग ५, कणकवली १०, देवगड १०, विजयदुर्ग १०, कुडाळ ५, वेंगुर्ले ५, राजापूर १५, लांजा १०, रत्नागिरी ३०, चिपळूण २० आणि खेडसाठी २० मिनी बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मुंबई-ठाणे यांचे जवळचे नाते असल्याने या भागात जादा बसेस सुरू करण्याबाबत निश्चितच आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भविष्यातील नियोजनाबाबत बोलताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, येत्या २०३५ नंतर एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकही डिझेल बस नसेल; सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील. सध्या प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.एसटी डेपोच्या २०० मीटर परिसराच्या आत जर खाजगी बसेस बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने महामंडळावर ३१० कोटींचा बोजा पडला आहे. सध्या प्रवाशांवर तिकीट दरवाढीचा बोजा टाकण्याचा विचार नाही; मात्र भविष्यात डिझेलचे दर अशीच वाढत राहिले, तर नाईलाजाने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी शेवटी सूचकपणे नमूद केले.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.