loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले सावणे बिचवर भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांची कार समुद्राच्या पाण्यात बुडाली

दापोली (प्रतिनिधी) : आंजर्ले येथील सावणे समुद्र किनार्‍यावर भटकंती करिता आलेल्या पूणे येथील पर्यटकांचा अतिउत्साहीपणा त्यांना चांगलाच नडला. त्यांची एसयूव्ही कार त्यांनी मौज मस्तीकरिता समुद्राच्या पाण्यात घातली आणि कार समुद्राच्या पाण्यात बुडाली. त्यामुळे त्यांना चांगलाच घाम फुटला. दापोली येथील स्वच्छ सुंदर समुद्र किनारपट्टीची भुरळ अनेकांना पडते. ज्यांना समुद्राचे दर्शन होत नाही, असे लोक पर्यटनासाठी दापोली तालुक्यातील समुद्र किनार्‍यावर येत असतात. तसे सध्या उष्णतेच्या उकाड्याने त्रस्त झालेले अनेकजण दापोलीतील समुद्र किनार्‍यावर भटकंतीसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले आहेत. समुद्रकिना-याचे आकर्षण असलेल्या अशाच पुणे येथून आलेल्या पर्यटकांना त्यांचा अतिउत्साह नडला. त्यांनी आणलेली एसयूव्ही कार आंजर्ले येथील सावणे किनार्‍यावरील समुद्राच्या पाण्यात मौज मजेसाठी घातली खरी मात्र कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुणे येथील काही पर्यटक एसयूव्ही कार घेऊन भटकंतीसाठी दापोली येथे आलेले होते. ते आंजर्ले सावणे येथील समुद्र किनार्‍यावर मौज मजा करण्यासाठी समुद्र किनार्‍यावर दाखल झाले. स्वच्छ सुंदर सपाट समुद्र किनारपट्टी पाहून त्यांनी आणलेली एसयूव्ही कार समुद्र किनार्‍यावर नेली. सुंदर स्वच्छ आणि मोकळी विस्तारीत समुद्र किनार्‍यावर दौड करता करता त्यांनी समुद्राच्या पाण्यात कार चालवण्याचे धाडस केले. कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने त्यांनी केलेले धाडस त्यांच्या चांगलेच अंगलट आले. समुद्र किनार्‍यावर एसयुव्ही कार नेत असताना येथील स्थानिकांनी त्यांना सुचना केली समुद्राच्या पाण्याला भरती आलेली आहे गाडी समुद्र किनार्‍यावर नेवू नका मात्र एकतील तर कसले पर्यटक ? समुद्राचे आकर्षण असलेल्या या हौसी पर्यटकांनी उत्साहाच्या भरात त्याकडे कानाडोळा केला.

टाईम्स स्पेशल

कार समुद्राच्या पाण्यात घातली आणि ते फसले. त्यांची एसयूव्ही कार समुद्राच्या पाण्यातील वाळूत रूतल्याने गाडी प्रयत्न करूनही काही बाहेर निघेना. अखेर स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या कारला बाहेर काढण्यात यश आले. दापोली तालुक्यातील दाभोळ ते केळशीपर्यतच्या समुद्र किनार्‍यावर आलेल्या पर्यटकांना स्थानिकांकडून वाहने पाण्यात तसेच समुद्र किनार्‍यावर नेण्यात येवू नये, असे सांगितले जाते. मात्र स्थानिकांच्या सुचनांकडे पर्यटक दुर्लक्ष करतात आणि मग त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते. तोच प्रकार आजच्या या समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या कारच्या घटनेवरून दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg