loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड पंचायत समितीतर्फे भिंगळोलीत महास्वच्छता अभियान कार्यक्रम

मंडणगड (प्रतिनिधी ) - मंडणगड पंचायतीच्या सभापती प्रणाली चिले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पंचायत समिती मार्फत पर्यावरण दिन विशेष प्लास्टिक मुक्त महास्वच्छता अभियान कार्यक्रम भिंगळोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध आस्थापनांचे अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पर्यावरण दिनविशेष प्लास्टिक मुक्त महास्वच्छता घनकचरा व्यवस्थापन २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी मंडणगड येथील भिंगळोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील तहसील कार्यालयाच्या परिसरात, भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरात, ग्रामपंचायत भिंगळोली कार्यालयाच्या परिसरात, मंडणगड ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये सर्व प्रकारचा प्लास्टिक तसेच अन्य प्रकारचा इतस्ततः पडलेला कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वच्छता अभियानामध्ये मंडणगड पंचायत समितीच्या सभापती प्रणाली संदेश चिले, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, सहाय्यक प्रशासनाधिकारी वामन मेंढे, उद्योजक संदेश चिले, विस्तार अधिकारी मुरलीधर कुरई, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती चांदिवडे, भिंगळोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र दिवेकर, पोलीस पाटील मळेकर, कर्मचारी, अधिकारी, शाखा अभियंता, आरोग्य कर्मचारी, अधिकारी, आशा सेविका, भिंगळोली ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मंडणगडच्या पर्यटन विकासासाठी एक विशेष ’व्हिजन’ डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे मंडणगड शहरात प्रवेश करताना प्रवेशव्दाराच्या दुतर्फा रस्त्याच्या कडेला टाकून ठेवलेल्या दिसणारा प्लास्टिक कचरा आणि इतर कचर्‍यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि रिसायकलिंग युनिट यांसारख्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या वापरावर भर दिला जाणार असल्याचे मंडणगड पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रणाली संदेश चिले यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg