loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात जेष्ठ नागरिकाला तोतया पोलिसांनी लुटले, २ लाखाचे दागिने घेऊन फरार

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यात रस्त्यावरून जाणाऱ्या जेष्ठ नागरिकाला अडवून पोलीस असल्याची बतावणी करीत दागिने घालून फिरणे धोकादायक असलायची सहानभूती दाखवीत जेष्ठ नागरिक अय्यास्वामी शामुगा थेवर (६४) याचे दागिने रुमालात बांधण्याचा जसा देत दागिने लांबवून दोघे तोतया पोलिसांनी पोबारा केल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात रविवारी दाखल करण्यात आलेली आहे. कासारवडवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाण्यात घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे राहणारे तक्रारदार अय्यास्वामी शामुगा थेवर (६४) हे मोटारकार एसी रिपेअरिंगचे काम करतात. ७ जून २०२६ रोजी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ते पत्नी, मुलगा, सून आणि नातवासह वर्तकनगर येथील अयप्पा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. देव दर्शनानंतर थेवर हे दुचाकी एक्टीव्हावरून घराकडे निघालेले होते. दरम्यान घोडबंदर रोडवरील वाघबीळ पुलाजवळील रिगल वाईन शॉपसमोर पोहोचल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना हात दाखवून थांबविले. "आम्ही पोलिस आहोत, इतके सोने घालून फिरणे धोकादायक आहे. दागिने काढून खिशात ठेवा," असे सांगत त्यांनी थेवर यांना सहानभूती दाखवून विश्वासात घेतले.

टाईम्स स्पेशल

थेवर यांनी गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १५ ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट आणि प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून खिशात ठेवल्या. त्यानंतर त्या दोघांनी दागिने रुमालात ठेवण्याचा सल्ला देत त्यांना बोलण्यात गुंतविले. याच दरम्यान दागिने हातोहात लंपास करून दोघांनी तेथून पलायन केले. घरी परतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच थेवर यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कासारवडवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg