दोडामार्ग (प्रतिनिधी) - झपाटयाने ऑनलाईन फसवणूक करून लाखो रुपये गंडा घालणे सारख्या घटना वाढत असताना दोडामार्ग धाटवाडी येथील गुरुदास गोपाळ मणेरीकर याना अज्ञात इसमाने फोन करून तुम्हाला मोबाईल रिचार्ज रिफंड १४९९ रूपये मिळतील, असे सांगून आपण सांगतो तसे मोबाईलमध्ये करा, असे सांगून दोन खात्यातील लाखो रुपये ऑनलाईन काढून फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे. दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत गुरुदास गोपाळ मणेरीकर वय-६३ यांनी म्हटले आहे. अज्ञात इसमाने कॉल करून तुम्हाला तुमचे मोबाईल रिचार्ज चे १४९९/- रुपये रिफंड मिळतील. मी सांगतो तसे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करा असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी त्यांच्या मोबाईलमधे गुगल मध्ये जाऊन माहिती भरल्यावर फिर्यादी यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोडामार्ग बचत खाते क्रमांक ६८०१६८७२९१३ मधून ९५,०००/- व बचत खाते क्रमांक २०१२२६९४७१७ मधून ९८,५०० रुपये ऑनलाईन अज्ञात व्यक्तीच्या अकाउंटवर गेले व फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक झाली आहे म्हणून. गुन्हा दाखल झाला आहे, असे सांगितले.





































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.