loader
Breaking News
Breaking News
Foto

बाळकृष्ण पेडणेकर याची ठाणे, मुंबई येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

ठाणे - विहंग कुलकर्णी चेस फाउंडेशनतर्फे ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्यने ठाणे, मुंबई येथे राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात केले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अव्वल खेळाडू सावंतवाडीचा बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने 73 वा क्रमांक पटकावला. बाळकृष्णला रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. भारतातील विविध राज्यातील सुमारे 498 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये तब्बल 314 आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंचा सहभाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर आणि मालवण येथील मयुुरेेश परुळेकर व मयुुरेेश मालवणकर या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत बाळकृष्णने 9 राऊंड्समध्ये 5 राऊंड्स जिंकून आणि 2 राऊंड्स बरोबरीत सोडवून 6 गुण केले आणि 73 वा क्रमांक मिळवला. व्हिज्युअली चॅलेंज्ड विदयार्थी मयुुरेेश परुळेकर याने 9 राऊंड्समध्ये 4 राऊंड्स जिंकून आणि 1 राऊंड बरोबरीत सोडवून 4.5 गुण केले. मयुुरेेशने आंतरराष्ट्रीय रेटिंग 27 गुणांनी वाढवले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली या विदयार्थ्यांनी हे यश मिळवले. ॲकेडमीच्या उपाध्यक्षा स्नेहा पेडणेकर यांनी यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg