loader
Breaking News
Breaking News
Foto

निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे - नगराध्यक्षा ममता वराडकर

मालवण (प्रतिनिधी) - जागतिक पर्यावरण सप्ताहाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेच्यावतीने गुरुवारी नगरपरिषद मुख्य कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. केवळ ५ जूनला पर्यावरण दिन साजरा करून न थांबता, निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मालवण नगरपरिषद शहरात स्वच्छता मोहिमेसोबतच मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्र वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. ’माझी वसुंधरा’ आणि ’स्वच्छ भारत अभियान २.०’ अंतर्गत आपण आपले प्रभाग आणि परिसर पर्यावरणपूरक बनवले पाहिजेत, असे प्रतिपादन यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण नगरपालिका आवारात नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव, महिला व बालविकास समितीच्या उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून व रोपट्यांना पाणी घालण्यात आले. याप्रसंगी नगरपालिकेच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा आणि सुधारित घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ चा फलकही प्रदर्शित करण्यात आला होता. यावेळी उपनगराध्यक्ष, नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांनी प्रत्यक्ष खड्डे खणून व रोपे लावून श्रमदान केले. तसेच नगरपालिकेच्या महिला व पुरुष कर्मचार्‍यांनीही नवीन लावलेल्या झाडांना पाणी घालत या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. नगरपालिकेच्या या उपक्रमामधून शहरामध्ये पर्यावरण जनजागृतीचा एक सकारात्मक संदेश देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg